नागपूर,
hindu-convention : भगवाघर, खरेनगर भागाचे सकल हिंदू संमेलन उत्साहात झाले. उपस्थित सर्व मान्यवरांनी गोमाता पूजन करून सभागृहात प्रवेश केला. दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रमुख वक्ते अमोल पुसदकर यांनी श्रीरामाची देशभक्ती, पांडवांची धर्म जपण्याची प्रतिज्ञा याचे आपल्याला विस्मरण होता कामा नये हे अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितले. सामूहिकरित्या भारत मातेची आराधना व सेवाभावातून धर्म जपण्याचे संस्कार संघाच्या शाखेतून दृढ केले जात आहेत, असे प्रतिपादन केले.
हिंदुत्वाची व्यापकता सांगून प्रमुख वक्ते अजय निलदावार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आजच्या परिस्थितीमध्ये ध्येयापासून भरकटलेल्या आजच्या हिंदू युवक युवतींना मार्गदर्शन करणारे उद््बोधन केले. त्यांना हिंदुत्व जपण्याचे आवाहन केले व त्याआड येणाèयांना सडेतोड उत्तर देण्याचा मंत्र त्यांनी दिला.
संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. भगवाघर व खरेनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, युवा व महिलांनी तसेच नगरसेविका, नगरसेवक प्रचंड उत्साहाने कार्यक्रमात सहभागिता केली. सुषमा दामोदरे यांच्यासह इतरांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.