क्रीडा धोरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी केली तडस यांच्यासोबत चर्चा

15 Mar 2026 19:11:33
वर्धा,
Home Minister Amit Shah दोन वेळा विक्रमी मतांनी विजयी होऊन संसदेत पोहोचलेले रामदास तडस यांना भारतीय जनता पार्टीने प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पक्षाने दखल घेतल्यानंतर माजी खासदार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस यांनी केंद्रीयगृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ६ मिनिटांच्या भेटीत शहा यांनी तडस यांच्या प्रकृर्तीची चौकशी केली. पक्ष बांधणी विषयी मार्गदर्शन आणि तेली समाजाच्या उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच तडस यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंकरिता प्रशिक्षण केंद्राची निर्मितीविषयी चर्चा केली.
 
 
Amit Shah
 
गृह व सहकार मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष रामदास तडस यांच्या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा केली. माजी खासदार रामदास तडस महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेचे अध्यक्ष व अखिल भारतीय तेली साहू महासभेचे कार्याध्यक्ष आहेत. Home Minister Amit Shah देशातील बहुसंख्य तेली समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत जुळून आहे. आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात होणार आहेत. ग्रामीण भागातील खेळाडू प्रतिभावान आहेत.
 
 
ऑलिम्पिक स्पर्धांच्या अनुषंगाने गावांमध्ये अकॅडमी घडल्यास त्याचा गावातील होतकरू खेळाडूंना फायदा होईल, असे तडस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले. सन २००२ नंतर देशात रोहिंग्याची वाढती वस्ती यावरही चिंता व्यत करीत त्यांनी मार्गदर्शन केले. Home Minister Amit Shah पक्षाने आपल्याला लोकसभेपर्यंत पोहोचवले. आता प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली. आपण पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून पक्ष बळकट करण्यालाच प्राधान्य देऊ असेही तडस यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0