गॅसचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

15 Mar 2026 14:49:13
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
illegal gas storage जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे, तसेच गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार आढळून आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अधिकाèयांना दिले.जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व गॅस पुरवठ्यासंदर्भात जिल्हाधिकाèयांनी महसूल भवनात आढावा बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
 

illegal gas storage 
या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तालुकानिहाय गॅस पुरवठ्यासंदर्भात यंत्रणा व गॅस एजन्सीकडून आढावा घेतला. यात त्यांनी नागरिकांमध्ये घबराटीचे व अफवांचे वातावरण आहे ते दूर करण्यासाठी जनजागृती करावी. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि पुरवठा विभागांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नियोजन करावे. नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याची खात्री करावी. गॅस सिलेंडरची ऑफलाईन नोंदणी सुरू असली तरी ऑनलाईन नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करून ती नोंदणी तत्काळ सुरू करावी. वसतीगृह, शिक्षण व आरोग्य व्यवस्थापनांना गॅसची उपलब्धता करावी. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिल्या.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
दरम्यान, गॅस पुरवठ्यासंदर्भात जिल्हा व स्थानिक प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार घरगुती गॅसचे वितरण सुरळीतपणे केले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अनावश्यक गर्दी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.
गॅस बुकिंग बंद नसून वितरण सुरळीत
उमरखेड : समाज माध्यमावर गॅस बुकिंग बंद, सिलेंडर मिळणार नाही अशा खोट्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक एजन्सींवर जाऊन तातडीने बुकिंग करण्यासाठी गर्दी करत असल्याचेही दिसून येत आहे. उमरखेड येथील श्रीनिवास गॅस एजन्सीकडून सध्या 1 ते 8 मार्च दरम्यान बुकिंग केलेल्या ग्राहकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचे वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली. घरगुती गॅसधारकांनी कोणतीही घाई किंवा चिंता करण्याचे कारण नाही. मागील आठवड्यात बुकिंग केलेल्या ग्राहकांना नियमितपणे गॅस टाकीचे वितरण केले जात आहे, असे एजन्सी संचालक गोपाल अग्रवाल यांनी सांगितले. तसेच उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनीही नागरिकांना आवाहन करताना गॅस वितरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0