नागरिकांच्या दारी महसूल सेवा पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : विश्वनाथ घुगे

15 Mar 2026 18:04:40
वाशीम,
Maharajsw Samadhan Shibir प्रशासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या तत्काळ सोडविणे हा महाराजस्व समाधान शिबिरांचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. राजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरासाठी प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये उपविभागीय अधिकारी देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, नोडल अधिकारी कैलास देवळे, नायब तहसीलदार आडे, नप्ते, चौधरी, देवळे, लटारे, भूमिअभिलेख उपअधीक्षक प्रवीण कुंजीर, दुय्यम निबंधक विजय सूर्यवंशी, गट विकास अधिकारी रवींद्र सोनोने, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, नगर रचना अधिकारी ललित राठोड, तसेच मंडळ अधिकारी सुभाष जवंजाळ यांच्यासह वाशीम तालुयातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, राजगाव मंडळातील विविध गावांतील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात महसूल विभागामार्फत दिल्या जाणार्‍या सुमारे १५ महत्त्वपूर्ण सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ७/१२ उतार्‍यातील दुरुस्ती, तसेच विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी सेवांचा समावेश होता.
 

Maharajsw Samadhan Shibir 
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात शाहीर इंगोले यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
Powered By Sangraha 9.0