पुणे
Married woman commits suicide समाजात महिलांसाठी सुरक्षितता आणि समान हक्क मिळवणे हा आजही एक मोठा प्रश्न आहे. घरगुती अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे, आणि महिलांना अत्याचाराच्या चक्रात अडकवून त्यांचा जीवनमान तोडला जात आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितिने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पीडित महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पुणे पोलिसांत सासू, साऱ्यांसह मृत महिलेच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत. पुणेतील लोणीकंदमध्ये घडलेली वैशाली जमकरेची आत्महत्या ही एक मोठी धक्कादायक घटना आहे, ज्याने केवळ एका कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं, तर त्या घटनेंतून सामाजिक आणि कायदेशीर सुधारणेची आवश्यकता देखील ठळकपणे समोर आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद परिसरात राहणाऱ्या वैष्णवी जामकर यांचा ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून वैष्णवी यांचा छळ होत असल्याचा आरोप आहे.तसेच छळ करून त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जायची. सततच्या या जाचाला कंटाळून पीडित महिलेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवी यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेल्या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वैष्णवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. पुण्यात पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.