आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण

15 Mar 2026 19:26:20
दहेगाव (गावंडे),
MLA Cup Grand Kabaddi Tournament स्व. विष्णुपंतकाका केळकर व स्व. प्रभाकरराव गावंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नूतन स्पोर्टिंग लब, दहेगाव (गावंडे) सेवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 
 
technology
 
भाजपा सेवाग्राम मंडळ अध्यक्ष गौरव गावंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद भेंडे, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा उपाध्यक्ष अर्चना वानखेडे, जिल्हा सचिव नंदू झोटिंग, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख वरुण पाठक, जयंत येरावार, प्रथम पुरस्कार दुर्ग स्पोर्टिंग लब संघाला मिळाला, द्वितीय पुरस्कार भिलाई क्रीडा मंडळ, तर तृतीय पुरस्कार जय बजरंग स्पोर्टिंग लब यांनी पटकावला. तसेच विविध वैयतिक पुरस्कार सुद्धा देण्यात आले. MLA Cup Grand Kabaddi Tournament या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना आपली कला दाखवण्याची उत्तम संधी मिळत असून क्रीडा क्षेत्राला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यत केले. कार्यक्रमाला नागपूरचे माजी नगरसेवक मधू घाटे, सरपंच राजश्री गावंडे, देवळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष स्वप्नील खडसे, नाचनगाव मंडळ अध्यक्ष जयश्री मोकदम, गजानन दुतारे, सुधाकर गावंडे, अर्चना कंगाले रामा चौधरी, देवेंद्र दुबे, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0