नागपूर,
nitin-gadkari : लोकप्रबोधन, लोकशिक्षण, लोकसंस्कारामुळे घडत असतो. आजच्या युवा पिढीला पुस्तक वाचायला वेळ नाही. अश्यात या पिढीला अध्यात्माकडे वळविण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करीत ‘बोलका श्री गजानन विजय ग्रंथ तयार झाल्यामुळे युवा पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी हा ग्रंथ मोलाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकप्रबोधन, लोकशिक्षण, लोकसंस्कार अत्यंत आहे. यातून समाज घडत असतो. आजच्या पिढीला पुस्तक वाचायला वेळ नाही. अश्यात या पिढीला अध्यात्माकडे वळविण्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करणे आवश्यक झाले आहे. त्याच प्रेरणेतून ‘बोलका गजानन विजय ग्रंथाची’ निर्मिती झाली. आता तरुण पिढीने या ग्रंथाचे नियमितपणे पठण करणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित जगातील पहिला बोलणारा श्री गजानन विजय ग्रंथाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नितीन गडकरी यांच्या हस्ते ग्रंथाचे लोकार्पण झाले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती जयंत म्हैसकर, संतनगरी शेगावचे शैलेंद्र महादेव पाटील, जेजुरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मंगेश घोणे, डोंबिवली येथील विद्या पडवळ, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार सुधाकर कोहळे, उमेश महाजन, संजय जैन, गिरीश देशमुख, शाम पेठकर आदींची उपस्थिती होती.
गडकरी पुढे म्हणाले, खासदार सांस्कृतिक महोत्सवादरम्यान आम्ही अनेक कार्यक्रम केले आहेत. यात गजानन महाराजांच्या जीवनावरील सादर केले आहे. भक्ती महोत्सवातील प्रतिसाद लक्षता घेता विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक, वंदे मातरम् आणि भगवत गीतेच्या पठणाचे विक्रम खासदार सांस्कृतिक महोत्सवात केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक पर्यटन सुरु केले असून ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. याशिवाय भजन स्पर्धेच्या माध्यमातून पाच हजार भजन मंडळींना भजनाचे साहित्य केले आहे.
आधुनिक काळातील आविष्कार
शेगावचे शैलेंद्र पाटील म्हणाले, ‘बोलका गजानन विजय ग्रंथ अत्यंत उपयुक्त असून नव्या पिढीला चांगले संस्कार करणारा हा ग्रंथ होय. विद्या पडवळ म्हणाल्या, ‘ आधुनिक काळातील आविष्कार म्हणजेच बोलका गजानन विजय ग्रंथ होय. गजानन वीणा या यंत्राच्या मदतीने पोथीमधील प्रत्येक सूर ऐकता येणार आहे. कोणत्या कोणती सेवा कधी करून घ्यायची याची योजना गजानन महाराजांनी केली असते. त्यानुसार हे कार्य नितीन गडकरी यांच्या हातून घडले आहे.
मंगेश घोणे म्हणाले, ‘आजची युवा पिढी मोबाईलमध्ये पूर्णत: व्यस्त दिसून येते. , ‘बोलका गजानन विजय ग्रंथ आपल्या मोबाईलमध्ये सुध्दा वाचता येणार आहे.
पाच भक्तांना मिळाला विजय ग्रंथ
कार्यक्रमाला उपस्थित गजानन भक्तांमधून ईश्वर चिट्ठी द्वारे निघालेल्या पाच भाग्यवान गजानन भक्तांना पाहुण्यांच्या हस्ते हा अद्भुत ग्रंथ महाराजांचा प्रसाद म्हणून भेट देण्यात आला. यामध्ये मयुरेश केणे, सुजाता खंबाटा, अपर्णा तेलपांडे, कल्पना वझलवार, पूजा बोडखे यांचा समावेश आहे.
मान्यवरांचा विशेष गौरव
गडकरी कुटुंबियांच्या वतीने स्नुषा ऋतुजा गडकरी आणि नात कावेरी यांनी सत्कार तर निर्मितीमध्ये योगदान असलेले शाम पेठकर, वीरेंद्र लाटणकर, महेश तिवारी, उमेश चारोळे, संजय मोरे, अजय बिवडे, महेंद्र पेंढारकर, देवेंद्र दोडके यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
विदर्भाच्या विविध भागांतून आलेले गजानन भक्त दास भार्गव महाराज, राजेंद्र शेगोकार, पुंडलिकराव देशमुख, दीपक कर्हाडे, अमित घीनमीने, मेधा भास्करवार, संजय कनोजे, नानासाहेब कांडलकर, हेमंत शेट्टीवार, अंजली दंडे, मनोज बावनकर आणि संजय देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गिरीश देशमुख यांनी केले.