१६ भावी पोलिसांची लेखी परीक्षेला दांडी!

15 Mar 2026 21:28:48
वर्धा, 
police-written-exam-held : पोलिस दलातील १३४ रित पदांसाठी भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली लेखी परीक्षा रविवार १५ रोजी शांततेत पार पडली. पात्र १ हजार ७११ उमेदवारांपैकी १ हजार ६९५ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली असून १६ उमेदवार गैरहजर राहिले. शारीरिक व मैदानी चाचणीनंतर रविवारी लेखी परीक्षा पार पडली असून आता निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
 
 
kl
 
 
 
पोलिस दलातील भरती प्रक्रियेसाठी ७ हजार ३१३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ५ हजार ५९९ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. प्रती दिवशी सुमारे ७०० ते ८०० उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्रियेत ३ हजार ५७४ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. या पात्र उमेदवारांमधून प्रत्येक पदासाठी १० ते १२ उमेदवार या प्रमाणात निवड करत १ हजार ७११ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. ही लेखी परीक्षा सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च अंतर्गत असलेल्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेनॉलॉजी महाविद्यालयात आज रविवारी १ हजार ६९५ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.
Powered By Sangraha 9.0