राजेंद्र बनसोड यांचा भावपूर्ण पारिवारिक सत्कार

15 Mar 2026 17:50:59
तभा वृत्तसेवा
दारव्हा
Rajendra Bansod, आंतरराष्ट्रीय महिलादिनी यवतमाळ जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचे कमांडर राजेंद्र बनसोड यांना 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदक या प्रतिष्ठीत सन्मानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन हृद्य सत्कार सोहळा आयोजित केला. हा कार्यक्रम कुटुंबातील सन्माननीय सदस्यांच्या प्रेमळ उपस्थितीने आणि उत्साहाने सजला.
 

Rajendra Bansod, 
कार्यक्रमात अमरावती एंजल वनचे संचालक रवी इंगळे, मनीषा इंगळे, पोदारच्या शिक्षिका पंकज गाडे, गायक आशिष गाडे आणि त्यांच्या दीपा गाडे यांनी राजेंद्र बनसोड आणि त्यांच्या पत्नी यांना शाल, पुष्पगुच्छ आणि मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला. कुटुंबातील लहान मुलांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.गायक आशिष गाडे यांनी भावपूर्णपणे गारवा हे गीत सादर करून वातावरण निर्मिती केली. त्यानंतर राजेंद्र बनसोड यांनी आपल्या मनोगतात सेंटर कमांडर ते राष्ट्रपती पदकापर्यंतचा प्रवास, गृहरक्षक दलातील उल्लेखनीय सेवा, गुणवत्तापूर्ण कार्य आणि त्यामागील संघर्ष व समर्पण याबद्दल मनोगत आपल्या भावनिक शब्दांत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपाला ‘तुम भी चलो हम भी चले’ हे प्रेरणादायी गीत सादर करून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला.
कार्यक्रमाचे सुंदर चित्रांकन गार्गी बनसोड यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये इंगळे (कास्ट्राईब संघटना) आणि पुष्पा इंगळे (माजी अध्यक्ष, भारतीय विद्यालय) यांच्यासह कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सत्कार केवळ एका पुरस्काराचा सन्मान नव्हता, तर कुटुंबाच्या एकजुटीचा, प्रेमाचा आणि शी राजेंद्र बनसोड यांच्या अथक परिशमाचा साक्षीदार ठरला. राष्ट्रसेवेच्या या प्रवासासाठी कुटुंबीयांचा अभिमान आणि शुभेच्छा यांनी हा कार्यक्रम अधिकच स्मरणीय बनवला.
Powered By Sangraha 9.0