...अखेर ‘ती’ची प्राणज्याेत मालवली

15 Mar 2026 21:48:53
अनिल कांबळे,
नागपूर, 
sbl-blast-case : राऊळगावातील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी असलेली ज्याेती धुर्वे गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत हाेती. मात्र, नियतीसमाेर तिने हार मानली. तिचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या एक लेकीच्या मृत्यूमुळे तिच्या पालकांनी रुग्णालयातच टाहाे फोडला. एसबीएल कंपनीतील स्फोटातील एकूण मृत्यूचा आकडा 25 वर गेला आहे.
 

cf  
 
 
 
सामू धुर्वे (तळेगाव, श्यामजी पंत) यांना ज्याेती (23) आणि अजय (18) अशी दाेन मुले. घरात माेठी असलेल्या ज्याेतीने बी.ए. द्वितीय वर्षांपासून महाविद्यालयीन शिक्षण साेडून आर्थिक कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एसबीएल कंपनीत नाेकरी स्विकारली हाेती. कुटुंबापासून दूर राहून खाेली भाड्याने घेऊन ती नाेकरी करीत हाेती. आपल्या भावाचे शिक्षण आणि वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एकट्या ज्याेतीवर हाेती. 23 वर्षांची ज्याेतीच्या लग्नाची लगबग घरी सुरु हाेती. मात्र, ज्याेतीने पडके घर बांधून झाल्यानंतर लग्नाचा विचार करु, असे ठामपणे सांगून घर बांधण्यासाठी पै-पै जमा करणे सुरु केले हाेते. या दरम्यान, 1 मार्चला एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटात ज्याेती गंभीर जखमी झाली हाेती. ती 65 टक्के जळाली हाेती. सुंदर दिसणाèया ज्याेतीचा या स्फोटात चेहरा भाजून विद्रूप झाला. तर हातापायाचे मांस अर्धवट गळालेले आहे. भाजल्याने छाती आणि पाेटालाही गंभीर जखमा झाल्या हाेत्या. उपचारादरम्यान ज्याेतीचा रविवारी सकाळीच मृत्यू झाला.
Powered By Sangraha 9.0