मुंबई
Tanushree Dutta बॉलिवूडमधील ‘डार्क साइड’चे वादग्रस्त आणि धक्कादायक वास्तव अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उघड केले आहे. तनुश्रीने मनोरंजन क्षेत्रातील शोषण, मॅनिप्युलेशन आणि खोट्या आश्वासनांच्या बाबतीत त्याच्या अनुभवांवर भाष्य करत नवोदित कलाकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
'मेरी सहेली' सोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तनुश्रीने सांगितले की, बॉलिवूडमध्ये अनेक वेळा नवोदित कलाकारांना आकर्षक गोड बोलांनी जाळ्यात ओढले जाते. "कोणी तरी तुमचं खूप कौतुक करतं, 'तुम्ही खूप हँडसम आहात, सुंदर आहात, तुम्ही नक्की हिरो किंवा हिरोईन व्हाल', असं म्हणत तुमचं आदराने वागणं सुरू होतं. मात्र, जास्त स्तुती एक सापळा ठरू शकतो," असे तनुश्रीने सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, नवोदित कलाकारांची सतत प्रशंसा केली जाते, आणि नंतर त्यांचे निर्णय प्रभावित करून त्यांना वेगवेगळ्या शोषणात्मक परिस्थितींमध्ये अडकवले जाते.
तनुश्रीने तिच्या अनुभवावर आधारित एक उदाहरण दिलं, ज्यात तिने सांगितले की, "लहानपणी पालक सांगतात की अनोळखी लोकांपासून सावध राहा. पण इंडस्ट्रीमध्ये तोच चॉकलेट वेगळ्या प्रकारचं असतो. लोक तुमच्या स्वप्नांचा वापर करून तुम्हाला त्यांच्याशी खेळवतात. खूप लोक इथे येतात, त्यांचा वापर केला जातो, त्यांच्यावर अत्याचार होतात आणि त्यांना टाकून दिलं जातं." ती म्हणाली की काही लोकांनाही अशा परिस्थितीत वेश्या व्यवसायात ढकलले जाते, ज्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य इतके खराब होते की ते आपल्या शहरात परत जातात.
तनुश्रीने तिच्या Tanushree Dutta अनुभवांबद्दल बोलताना तिच्या उद्देशावरही स्पष्टता दिली. "मी या विषयांवर सार्वजनिकपणे बोलते कारण इंडस्ट्रीत नाव आणि यश मिळवण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुणांना सावध करणे हे माझे उद्दिष्ट आहे. जर मला बोलण्यासाठी मंच मिळाला आहे आणि माझ्या बोलण्यामुळे चार जणांचं आयुष्य वाचलं, तरी ते माझ्यासाठी खूप मोठं आहे," असे ती म्हणाली.
अशा प्रकारच्या शोषणाच्या कथा आणि दडपणांचे दाखले मनोरंजन उद्योगाच्या गडद आणि गुप्त बाजूला उजागर करतात. जरी यशाच्या चमकदार कथांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते, तरी अशा गोष्टी फार कमी लोकांपर्यंत पोहोचतात, असे तनुश्रीने सांगितले.
तनुश्री दत्ताचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरले असून, अनेकांनी तिच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमधील वाईट अनुभवांबद्दल बोलण्यास आरंभ केला आहे, जो नवोदित कलाकारांसाठी एक महत्त्वाचा संदेश ठरू शकतो.