जिल्ह्यातील नगर परिषद व पंचायतींना 42 कोटींचा निधी

15 Mar 2026 14:45:06
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal district केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानंतर्गत 44 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते विकास प्रकल्पांसाठी राज्याच्या हिश्यातील 360 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, उमरखेड, यवतमाळ, पांढरकवडा या नगर परिषदा आणि ढाणकी नगर पंचायतचा समावेश आहे.
 

Yavatmal district, 42 crore fund 
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार, नगर विकास विभागाने 10 मार्च 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रगतीपथावर असलेल्या 44 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पाणीपुरवठा, मलनिस्सारण व रस्ते विकास प्रकल्पांसाठी एकूण 360.263 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी केंद्र शासनाकडून 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात राज्यांना उपलब्ध करून देण्यात येत असून संबंधित नगर संस्थांच्या मंजूर प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. यात राज्य शासनाचा हिस्सा उपलब्ध करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्र्यांनी मानले आभार
या निर्णयानुसार या जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एक नगर पंचायतच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना 42 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यात उमरखेड नपच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 12 कोटी रुपये, ढाणकी नपंच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 7 कोटी रुपये, दिग्रस नप पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 5 कोटी रुपये, यवतमाळ नपच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये, पांढरकवडा नप पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नागरी सुविधांच्या प्रकल्पांना चालना
नगरोत्थान महाभियानांतर्गत Yavatmal district पूर्वी मान्यता दिलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या राज्य हिस्सा निधी म्हणून हे विशेष अनुदान वापरले जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या नगरोत्थान महाअभियानाच्या कार्यपद्धतीनुसार खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. या निधीमुळे नागरी स्थानिक संस्थांच्या पाणीपुरवठा, मल:निस्सारण तसेच रस्ते विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे
Powered By Sangraha 9.0