यवतमाळातील आदिवासी महिला राष्ट्रपती भवनात

15 Mar 2026 13:49:14
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
tribal women ग्रामीण भागातील महिलांनी जिद्द, संघटन आणि परिश्रमांच्या बळावर मोठे यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील चार आदिवासी महिलांनी घालून दिले आहे. उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्य समूहात कार्यरत असलेल्या या महिलांना दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाला भेट देण्याची संधी मिळाली. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.
 

tribal women 
राष्ट्रपती कार्यालयाद्वारे राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येथे विशेष घटकांची भेट मंगळवार, 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातून चार महिलांची निवड करण्यात आली होती.
त्यामध्ये यवतमाळ tribal women  जिल्ह्यामधून कापरा येथील वर्षा कोमटी, भारी येथील संगीता गाडेकर, येरद येथील सुनंदा मेश्राम व येळाबारा येथील जिजा रामगडे या कोलाम आदिवासी समाजातील महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमामधून सहभागी होण्याची संधी मिळाली. दिल्ली दौèयात त्यांनी राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानासह इंडिया गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, राजघाट, जंतरमंतर व अक्षरधाम मंदिर या ऐतिहासिक स्थळांना भेट देत अविस्मरणीय अनुभव घेतला.
 
 
ग्रामीण भागातील tribal women  साध्या कुटुंबातून आलेल्या या महिलांचा राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. उमेद, अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्य समूहांद्वारे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत असून ‘लखपती दीदी’ अभियान, समुदाय गुंतवणूक निधी, फिरता निधी, कृषी व उपजीविका प्रकल्प तसेच कौशल्य प्रशिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. या दौèयासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे यांचे मार्गदर्शन लाभले. तर समन्वयक म्हणून प्रशांत चावरे यांनी विशेष भूमिका बजावली.
Powered By Sangraha 9.0