प्रसादनगर परिवार ज्येष्ठ नागरिक मंडळाचा १४ वा वर्धापन दिन

16 Mar 2026 13:26:51
नागपूर,
Prasadnagar प्रसादनगर परिवार ज्येष्ठ नागरिक मंडळाचा १४ वा वर्धापन दिन उच्च बाळासाहेब देवरस सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश खडतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल सोले उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष अर्चना खडतकर, सचिव वैद्य तसेच कोषाध्यक्ष विजय येवलेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
 
Prasadnagar
 
प्रमुख पाहुणे आमदार अनिल सोले यांनी ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. Prasadnagar कार्यक्रमात मंडळाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अर्चना खडतकर, दिलीप देशपांडे, अलोणी, विजय येवलेकर आणि प्राची देशपांडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
कार्यक्रमाचे संचालन प्राची देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतीश कोतवालीवाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन शर्मिला चौरसिया यांनी केले. Prasadnagar कार्यक्रमाच्या सुरुवातीला खडतकर, शेंडे आणि देशपांडे यांनी प्रार्थना सादर केली, तर पसायदान आणि वंदे मातरम् संजीवनी यांनी सादर केले. या कार्यक्रमाला वाघमारे, फिरके तसेच परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: शर्मिला चौरसिया, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0