वार्षिक परीक्षेच्या तारखा ठरवण्याचे स्वातंत्र्य आता शाळांना मिळणार!

16 Mar 2026 21:55:31
वर्धा,
wardha-news : मार्चच्या पहिल्या दहा दिवसांत विदर्भात आलेली उष्णतेची लाट आत्ताच विद्यार्थ्यांना घाम फोडत असून त्यातच एससीईआरटीने जाहीर केलेल्या पॅट परीक्षांच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांची होरपळ होण्याची शयता आहे. राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची संकलित मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) यंदा ११, १५ आणि २२ एप्रिलला होणार आहे. मात्र, यंदा केवळ पॅट चाचणीसाठीच राज्यस्तरीय वेळापत्रक देण्यात आले असून इतर विषयांच्या वार्षिक परीक्षांचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक संचालनालयांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य यंदा शाळांना पुन्हा मिळण्याची शयता आहे.
 

jlk 
 
या वेळापत्रकात भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांचा समावेश करण्यात आला असून इतर विषयांच्या चाचण्या व परीक्षा शाळास्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षांबाबतचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यभर एकच केंद्रीकृत वेळापत्रक लागू न ठेवता शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार परीक्षा नियोजन करता येणार आहे. मुख्याध्यापकांनी यापूर्वी केलेल्या मागणीचा काही प्रमाणात सकारात्मक विचार झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींचे मत आहे. गेल्या वर्षी परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालल्या होत्या. यंदा त्या २२ एप्रिलपर्यंत मर्यादित राहणार आहेत. संपूर्ण राज्याला एकच वेळापत्रक देण्याऐवजी फत भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
 
 
पॅट चाचणीचे वेळापत्रक जाहीर करताना तिसर्‍या पेपरची तारीख २२ एप्रिल ठेवण्यात आल्याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. पॅटचा शेवटचा पेपर २२ एप्रिलऐवजी १५ एप्रिललाच घ्यावा. २२ एप्रिलनंतर निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांना अत्यंत कमी वेळ मिळतो. अनेक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागते. त्यामुळे अवघ्या काही दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, गुणनोंद करणे आणि निकालपत्रके तयार करणे ही मोठी कसरत ठरणार आहे, असे विविध शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.
दुसरी ते आठवीपर्यंतच्या पॅट परीक्षा ११ ते २२ एप्रिलपर्यंत आहे. दुसरीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची तुलना करता येणार नाही. त्यामुळे दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ एप्रिलच्या आत घेण्यात यावी. ११ ते २२ दरम्यान फार गॅप आहे. या दरम्यान ११, १३ व १५ तारखेला परीक्षा घेता येईल. यासाठी शिक्षणाधिकारी स्तरावर स्वातंत्र्य देण्यात यावे. त्यानंतर शिक्षक उपचारात्मक उपक्रम राबवित असतात. निकाल तयार करण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळू शकतो, अशी प्रतिक्रीया स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0