ऑटाेचालकांमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत

16 Mar 2026 13:16:40
अनिल कांबळे
नागपूर, 
nagpur traffic शहरात ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे विस्कळीत वाहतूक आणि वाहतूक काेंडी निर्माण हाेत आहे. शहरातील विविध रस्त्यावर ऑटाेचालकांची दादागिरी सुरु असून त्यासाठी वाहतूक पाेलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध कारणीभूत असल्याचे चित्र आहे. शहरात वाहतूक काेंडी नेहमीचीच आहे. त्यासाठी विविध घटक कारणीभूत असून त्यात ऑटाेचालकांची मनमानी भूमिका महत्वाची आहे. शहरांमधील अनेक चाैकांमध्ये बेशिस्त ऑटाेचालकांमुळे गंभीर वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेते. ’नाे पार्किंग’ मध्ये वाहने उभी करणे, अस्ताव्यस्त प्रवासी उतरवणे, भरधाव ऑटाे अचानक थांबवणे, प्रवाशी मिळविण्यासाठी स्पर्धा करणे इत्यादी कारणांमुळे शहरात वाहतूक बेशिस्त हाेते.
 

auto-drivers-disrupt 
 
 
काही ऑटाेचालक नेहमी मनमर्जीप्रमाणे वाहन चालवतात तसेच प्रवाशांसाेबत अर्वाच्छ शब्दांमध्ये संवाद साधतात. त्यामुळे सरसकट ऑटाेचालकांकडे पाहण्याचा दृष्टीकाेन बदलताे. सीताबर्डी, धंताेली, वेस्ट हायकाेर्ट राेड, आरबीआय चाैक, शंकरनगर, काटाेल नाका चाैक, नंदनवन, भांडे प्लाॅट, लकडगंज, लाल ईमली चाैक, सीए राेड, मेयाे चाैक इत्यादी ठिकाणी ऑटाेचालकांची मनमानी सुरु असते. ऑटाेचालकांच्या बेशिस्तपणामुळे अन्य वाहनचालकांना त्रास हाेताे. ऑटाेचालकांना हटकल्यास जवळपास आठ ते दहा चालक एकत्र येऊन थेट शिवीगाळ आणि धमक्या देतात, असेही प्रकार घडल्याचे समाेर आले आहे. ऑटाेमध्ये तीन किंवा पाच प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असताना 8 ते 10 प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. ऑटाेचालक कुठेही पार्किंग करीत असल्यामुळे अन्य वाहनांचा रस्ता अडविल्या जाताे. मात्र, ऑटाेचालकांना कुणी हटकण्याची हिम्मत करु शकत नाही. कारण, जवळपास प्रत्येक ऑटाेचालकाचे वाहतूक पाेलिसांशी महिन्याकाठी ‘अर्थपूर्ण’ संबंध असतात. त्यामुळे ऑटाेत कितीही प्रवाशी असले तरीही कारवाई करण्यात येत नाही. नावापुरती किंवा वरिष्ठांना दाखविण्यापुरती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे.
अपघाताचा धाेका कायम
मुख्य रस्त्यावर कुठेही ऑटाे पार्किंग केल्यामुळे किंवा प्रवाशी दिसताच भरधाव वाहनाला अचानक थांबविल्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. ऑटाेचालक आणि वाहतूक पाेलिस या दाेघांनाही याबाबत चिंता नसते. ऑटाेचालकांच्या प्रवाशी बसविण्याच्या स्पर्धेमुळेसुद्धा अनेकदा अपघात घडतात. काही मुजाेर ऑटाेचालकांवर पाेलिसांकडून कारवाई हाेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाèया ऑटाेचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते. तसेच वाहतूक काेंडी हाेऊ नये म्हणून वाहतूक पाेलिस नेहमी तत्पर असतात.nagpur traffic वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळावे, जेणे करुन काेंडी निर्माण हाेणार नाही.
- अनिरुद्ध पुरी (वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सीताबर्डी वाहतूक शाखा.)
Powered By Sangraha 9.0