बेसा–पिपळा नागरिकांचा “हॅपी स्ट्रीट” उत्सव यशस्वी

16 Mar 2026 14:31:29
नागपूर,
Happy Street बेसा–पिपळा नगरपंचायतीतर्फे आयोजित “हॅपी स्ट्रीट” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सकाळी व्यायाम, झुंबा, डान्स, योगा, विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नागपूरचे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स शशांक उदाखे, वैभव सोनवणे, नेहा ठोंबरे आणि अक्षय ढोबळे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह आणि युवकांमध्ये विशेष आकर्षण प्राप्त झाले.
 
Happy Street
 
या यशस्वी कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष किर्ती बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष नरेश भोयर आणि मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी सहकार्य केले. Happy Street तसेच बांधकाम सभापती मुकेश काळे, महिला व बालकल्याण सभापती विद्या भोयर, महिला व बालकल्याण उपसभापती मनीषा राजुरकर, नगरसेविका वैशाली ढोणे, वैशाली भोयर, वैशाली वानखेडे, कल्पना सुके आणि गंगा गोल्हार यांचे विशेष समर्थन लाभले. बेसा–पिपळा नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक व नगरसेविकांचेही सहकार्य उल्लेखनीय ठरले. बेसा–पिपळा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी आयोजित हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0