वर्धा,
rahul-gandhis-actions : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सुरू असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांतील काही खासदारांनी संसद परिसरात चहा-बिस्कीटसह चहा बिस्कीट पार्टी केली. संसद ही देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था आहे. तेथे असे कृत्य दुर्दैवी आहे. संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. संसदीय नियमांचा भंग आहे. अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी देवळीच्या वतीने खा. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, देवळी शहर अध्यक्ष उमेश कामडी, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कारोटकर, विजय गोमासे, रवी भानारकर, संतोष भोयर, दिवाकर झाडे, हरिचंद्र देवतळे, शुभांगी कुर्जेकर, सुरेखा कारोटकर, विभावरी बजाईत, मंगला पिपंळकर व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते व अन्य विरोधी पक्षातील जवळपास २० खासदारांनी चहा-बिस्कीट पार्टी आयोजित करणे ही अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रवेशद्वारासमोर बसून विरोध करण्याचे नाटक केले जे संसदीय नियमांची आणि अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारे आहे त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी तडस यांनी केली.