धुळे
contaminated milk धुळे जिल्ह्यातील करवंद गावातील लक्ष्मीबाई वाघ यांनी विकत घेतलेल्या दुधात घातक रसायन फॉर्मालिन आढळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने दुधाचा नमुना तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठवला होता. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, तपासलेल्या दुधात फॉर्मालिन आढळल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
तपासणीत हेही स्पष्ट झाले की दुधात म्हशीच्या दुधासाठी अपेक्षित किमान फॅट प्रमाण देखील कमी होते. साधारणपणे म्हशीच्या दुधात किमान ५ टक्के फॅट असणे अपेक्षित असते, परंतु तपासलेल्या नमुन्यात फक्त ४.३ टक्के फॅट आढळले. सर्वात गंभीर बाब म्हणजे फॉर्मालिन चाचणी पॉझिटिव्ह आली असून, या दुधात जाणीवपूर्वक घातक रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले आहे.फॉर्मालिन हा अत्यंत घातक रासायनिक द्रावण आहे. त्याचा प्रामुख्याने औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जातो. प्रयोगशाळा किंवा हॉस्पिटलमध्ये मृतदेह किंवा प्राण्यांचे अवयव सडू नयेत म्हणून ते फॉर्मालिनमध्ये ठेवतात. याशिवाय जंतुनाशक म्हणून, शस्त्रक्रिया कक्ष निर्जंतुक करण्यासाठी तसेच रबर, रंग व कापड उद्योगात देखील या रसायनाचा वापर केला जातो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,contaminated milk काही विक्रेते उन्हाळ्यात किंवा लांबच्या प्रवासादरम्यान दूध खराब होऊ नये म्हणून त्यात फॉर्मालिन मिसळतात. हे रसायन दुधातील जिवाणूंची वाढ थांबवते आणि दूध दीर्घकाळ ताजे राहते. त्यामुळे दूध दोन ते तीन दिवस बाहेर ठेवले तरी ते फुटत नाही आणि ताजे असल्यासारखे दिसते. परंतु यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.फॉर्मालिन हा मानवी शरीरासाठी ‘कार्सिनोजेनिक’ रसायन आहे, ज्यामुळे दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो. तसेच, यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे तात्काळ त्रास होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा रसायनयुक्त अन्नपदार्थांचे दीर्घकालीन सेवन मूत्रपिंड निकामी होणे, रक्ताचा कर्करोग तसेच पचनसंस्थेचे गंभीर आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.
धुळे जिल्ह्यातीलcontaminated milk हे प्रकरण दूध विक्रीत होणाऱ्या गैरव्यवहारावर आणि उपभोक्त्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर चौकशी करणे गरजेचे आहे, तसेच अशा प्रकारच्या दुधाच्या पुरवठ्यावर कडक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.