शासकीय धान्य उघड्यावर

16 Mar 2026 18:32:27
कोरची,
government grain आदिवासी विविध कार्यकारी संस्था खरेदी केंद्र, कोरची येथे साठवून ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे समोर आले आहे. आधारभूत खरेदी योजना हंगाम 2024-25 पासून धान्याची उचल न झाल्यामुळे हे धान्य दीर्घकाळ उघड्यावर पडून असल्याचे दिसून येत आहे.
 

government grain, Korchi, 
सदर धान्य योग्य प्रकारे साठवण न करता उघड्यावर ठेवण्यात आले असून त्यावर ताडपत्री देखील झाकण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पावसामुळे धान्य पूर्णपणे ओलावून खराब झाले असून सध्या त्या धान्यातून दुर्गंधी येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे.एकीकडे अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झालेले असताना, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य उघड्यावर सडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात खरेदी केंद्रातील government grain  संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यापूर्वीही या अडचणीबाबत एका कर्मचार्‍याला कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) देण्यात आलेली होती. तसेच आधारभूत खरेदी योजना हंगाम 2024-25 मधील धान्याची वेळेत उचल न झाल्यामुळे आणि पावसामुळे काही धान्य खराब झाले आहे. खराब झालेल्या धान्याबाबत लवकरच लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विक्री करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक गणेश सावळे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0