कारंजा लाड
induction cooktops आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शयता व्यक्त केली जात असताना घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यायी स्वयंपाक साधनांकडे वळण्यास सुरुवात केली असून इलेट्रिक इंडशन शेगड्यांची मागणी अचानक वाढल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील भांड्यांच्या दुकानांमध्ये इंडशन शेगड्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. घरगुती गॅसचा संभाव्य तुटवडा निर्माण झाल्यास स्वयंपाकाच्या कामात अडचण येऊ नये, या हेतूने अनेक कुटुंबांनी इंडशन शेगडी खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे शहरातील अनेक दुकानांमधील इंडशन शेगड्यांचा साठा अल्पावधीतच संपल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. शेकडो ग्राहकांनी या शेगड्यांची खरेदी केल्याने दुकानदारांकडे उपलब्ध असलेला स्टॉक जवळपास संपल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, नवीन साठा उपलब्ध होईपर्यंत अनेक ग्राहक दुकानांमध्ये आपले नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवत असल्याचे देखील दिसून येत आहे. गॅस टंचाईच्या संभाव्य चर्चेमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यातूनच इंडशन शेगड्यांची मागणी वाढत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत नवीन साठा बाजारात दाखल झाल्यानंतर या मागणीत आणखी वाढ होण्याची शयता वर्तविली जात आहे.