ध्वनीपेक्षा १३ पट वेग, अवाढव्य पल्ला!

16 Mar 2026 14:03:35
तेल अवीव
Iran war अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने आज १७ व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्रायला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू आहेत. तर, इस्रायललाही क्षेपणास्त्र हल्ले करुन हतबल केले आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
 
sejjil missile 
इराणने प्रथमच आपल्या भात्यातील सर्वात घातक शस्त्र असलेल्या ’सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा’ वापर करून इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.
काय आहे हे ’सेजिल’ क्षेपणास्त्र?
Iran war इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालणारे असून त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा १३ पटीने जास्त (मॅक १३) आहे. २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलसह भारत, युक्रेन आणि रशियाच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकते. कुराणातील ’जळणारा दगड’ या संदर्भावरून याला ’सेजिल’ असे नाव देण्यात आले आहे. इराणने आपल्याकडील अनेक क्षेपणास्त्रे, सुरक्षित असून त्यांना टप्प्याटप्प्याने युद्धात वापरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय, मागील काही दिवसात आणखी काही क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्याचा वापरही होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
Powered By Sangraha 9.0