साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासात स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

16 Mar 2026 17:57:30
जळगाव
Sai Baba temple जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावामध्ये साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळण्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले आहेत, मात्र सुदैवाने कोणताही जीवितहानी झालेली नाही.
 

Jalgaon, Sai Baba temple, devotees’ residence, slab collapse, 
माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढून जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेनंतर प्रताप पाटील यांनी सांगितले की, “साईबाबा मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासातील बांधकामाच्या ठिकाणी स्लॅब अचानक कोसळल्याने कामगार जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.”या घटनेमुळे बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने ही Sai Baba temple घटना गंभीरतेने घेतली असून भविष्यात अशी अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.या घटनेत कामगारांचे जीव वाचल्यामुळे मोठा धक्का टळला असला तरी, बांधकाम सुरक्षा नियमांचे पालन करण्याची गरज यावर अधोरेखित झाली आहे.
Powered By Sangraha 9.0