वणीत 28 मार्चला ‘माजी आमदार केसरी कुस्ती’

16 Mar 2026 18:35:46
तभा वृत्तसेवा
वणी,
Kesari wrestling श्री रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त वणी येथे शनिवार, 28 मार्च रोजी भव्य माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे. या महादंगलमध्ये भारतातील नामांकित पुरुष व महिला पहिलवान सहभागी होणार असून तब्बल 21 लाख रुपयांची लूट होणार आहे. या कुस्ती महादंगलला क्रीडा प्रेमींसह कुस्ती शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, अशी माहिती रंगनाथ स्वामी मंदिरात पांडुरंग लांजेवार यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली.
 


 Kesari wrestling, Wani, March 28 event 
या स्पर्धा मनसे नेते राजू उंबरकर यांच्या सौजन्याने सुनंदा मधुकरराव उंबरकर स्मृतीप्रीत्यर्थ जत्रा मैदानवर तयार करण्यात आलेल्या मैदानावर होणार आहेत. 28 मार्चला सकाळी कुस्ती फेèयांना सुरुवात होणार असून रात्रीपर्यंत दंगल रंगणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये (माजी आमदार केसरी बहुमान व ललित लांजेवार स्मृतीप्रीत्यर्थ चांदीची गदा), द्वितीय 71 हजार, तृतीय 51 हजार, चतुर्थ 41 हजार व पाचवे 31 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच इतर क्रमांकांसाठीही आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
महिला गटात प्रथम पुरस्कार 21 हजार व (संभाजी पोटदुखे स्मृतीप्रीत्यर्थ चांदीची गदा), द्वितीय 11 हजार, तृतीय 7 हजार, चतुर्थ 5 हजार, पाचवे 4 हजार, सहावे 3 हजार व सातवे 2 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या महादंगलमध्ये राज्यातील तसेच देशभरातील कुस्तीपटू सहभागी होणार असून पारंपरिक कुस्तीचा थरार अनुभवण्याची संधी वणीकरांना मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0