नवी मुंबई,
navi-mumbai-apmc-market : कोकणातून आलेल्या आंब्याची तब्बल सहा हजार पेट्यांची आवक नवी मुंबई एपीएमसी बाजारात झाली आहे. यामुळे आंबा खवय्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आंब्याचे दर अजूनही वरचढ आहेत.
मागील काही दिवसांपासून आंब्याची आवक हळूहळू वाढत होती, आणि आजची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु, हवामानातील बदल आणि तापमानातील चढउतार यामुळे कोकणात अनेक आंबे खराब झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजारात सध्या एका पेटीचा दर चार ते नऊ हजार रुपये दरम्यान आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढेल तरी दर वरचढ राहण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचे आवाहन आहे की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खवय्यांनी किंचित अधिक किंमत देणे योग्य ठरेल.