गॅसऐवजी इथेनॉल? कोपरगावमध्ये अनोखा प्रयोग

16 Mar 2026 16:42:38
नवी मुंबई,
LPG Crisis : आयात होणाऱ्या व्यवसायिक गॅसवर अवलंबित्व कमी करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने संजीवनी उद्योग समूहाच्या सहकार्याने इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन केले आहे. पुण्यातील संशोधन संस्थेच्या मदतीने तयार केलेल्या या स्टोव्हचा खर्च पारंपरिक व्यावसायिक गॅसच्या तुलनेत कमी असून तो अधिक किफायतशीर ठरू शकतो.
 

LPG Crisis
 
 
 
कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की, देशात इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढली असून, सरकारने इथेनॉल गॅस किंवा स्टोव्हसाठी मान्यता दिल्यास सहकार क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. हे स्टोव्ह इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करेल आणि खर्च वाचवेल. केनियात जवळपास १५ लाख घरांमध्ये अशा स्टोव्हचा वापर होत असल्याचेही नमूद केले.
 
अद्याप सरकारी धोरण नसल्यामुळे हा प्रकल्प स्थगित आहे, पण योग्य धोरणात्मक निर्णय घेतल्यास शेतकरी ऊर्जादाता बनू शकतो, असा विश्वास प्रकल्पाशी संबंधितांनी व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0