मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारचे पाऊल

16 Mar 2026 16:55:53
मुंबई,
Educate Girls NGO राज्यातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराच्या माध्यमातून शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींना पुन्हा शिक्षणाशी जोडणे आणि राज्यातील मुक्त शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.
 

Educate Girls NGO 
राज्यातील अनेक भागांमध्ये आर्थिक अडचणी, सामाजिक परिस्थिती किंवा स्थलांतर यांसारख्या कारणांमुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. अशा मुलींना पुन्हा शिक्षणात सहभागी करून घेण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्था एकत्रितपणे शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणे, त्यांना पुन्हा शाळेत दाखल करणे तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासाठी काम करणार आहेत.या उपक्रमाचा विशेष भर ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांवर असणार आहे. अशा Educate Girls NGO  भागांमध्ये मुलींचे शिक्षण खंडित होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाच्या मुक्त शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून या मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलींना पुन्हा शाळेशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे राज्यातील मुलींच्या शिक्षणाला नवे बळ मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0