महिलेचा निवस्त्र मृतदेह : महिला जागीच ठार

16 Mar 2026 15:35:00
पुणे,
stray dog attack पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात मध्यरात्री सहा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला जागीच ठार केले. मृत महिलेचे नाव शोभा विजय वाघमारे असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या.
 

Pune, Chakan, stray dog attack, woman killed, 
घटना सोमवार, १६ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास घडली. महिलेने आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जाताना अचानक कुत्र्यांच्या झुंडीला सामोरे जावे लागले. या दरम्यान सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार, महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र भटक्या कुत्र्यांच्या आक्रमकतेसमोर तिचा बचाव अपुरा ठरला.
कुत्र्यांनी महिलेवर हात,stray dog attack  पाय, तोंड आणि मानेवर गंभीर हल्ला करून तिचा जीव घेतला. तिला झालेल्या जखमांमुळे अतिरक्तस्त्राव झाला आणि सुमारे पंधरा मिनिटांतच महिलेचा मृत्यू झाला. सकाळी स्थानिकांनी महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्यावर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला काहींनी खून किंवा अन्य अत्याचाराचा संशय व्यक्त केला, परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले.या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून स्थानिक प्रशासनाकडून योग्य पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0