९८ ठिकाणी धाडी; २८ गॅस सिलेंडर जप्त

16 Mar 2026 21:57:33
वर्धा, 
gas-cylinders-seized : गॅस सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी गठित केलेल्या ९ पथकांनी तब्बल ९८ ठिकणी धाड टाकून २८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहे. या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायासाठी होत होता.
 
 
k
 
सद्यस्थितीत जागतिक युद्धाची परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही. इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होण्याची शयता आहे. अशा स्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी तसेच अवैध गॅस सिलेंडर विक्री व वापरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात ९ दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्याला पर्याप्त प्रमाणात एलपीजी सिलेंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. इंधन कंपन्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सिलेंडर प्राप्त झाल्यापासून २८ दिवसाचे आत बुकींग करू नये. गॅस वितरकांकडे सिलेंडरसाठी गर्दी टाळावी. तसेच घरगुती सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कारणासाठीच करावा. व्यावसायिक कामाकरिता घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होताना दिसत असून पथकाने आतापर्यंत ९८ ठिकाणी धाडी टाकून २८ सिलेंडर जप्त केले आहे.
Powered By Sangraha 9.0