अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तकांची सती चालणार नाही

16 Mar 2026 21:54:11
हिंगणघाट,
pallavi-barahate : शहरातील काही खाजगी तसेच सीबीएसई संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी थेट संबंध नसलेल्या अतिरित व महागड्या पुस्तकांची खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पालकांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याची बाब गंभीर असून अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तकांची सती खपवून घेणार नाही, असा इशारा शिक्षण सभापती पल्लवी बाराहाते यांनी दिला आहे.
 
 
j
 
हिंगणघाट नगरपरिषद शिक्षण समितीच्या वतीने शिक्षण सभापती पल्लवी बाराहाते यांनी पुढाकार घेत संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर केले. शाळांनी केवळ अधिकृत अभ्यासक्रमानुसार आवश्यक असलेलीच पुस्तके विद्यार्थ्यांना सुचवावीत. तसेच अनावश्यक व अवाजवी पुस्तकांचा बोजा विद्यार्थ्यांवर टाकू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता राखण्यासाठी व पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडू नये, पुस्तकांची विक्री शाळा परिसरात करू नये, अशा बाबींचीही अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यत करण्यात आली आहे.
शहरातील पालकांनीही या विषयात जागरूक राहून कोणत्याही प्रकारची अनावश्यक पुस्तकांची सती होत असल्यास नप शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0