एसआर स्टार म्युझिकल ग्रुपचा बहारदार संगीतमय कार्यक्रम

16 Mar 2026 12:47:54
नागपूर,
SR Star Musical Groups एसआर स्टार म्युझिकल ग्रुपचा पहिलाच पण अत्यंत बहारदार संगीतमय कार्यक्रम नुकताच मानेवाडा चौकातील जोनपुर रेस्टॉरंटच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक अभिजीत रामटेके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या संगीतमय कार्यक्रमात जुन्या आणि नव्या अशा अनेक श्रवणीय व गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित रसिकांनी या गीतांचा मनमुराद आनंद लुटला, अशी माहिती ग्रुपचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. सोहन चवरे यांनी दिली.
 
SR Star Musical Groups
 
कार्यक्रमात अधीर मन झाले, मधुबन खुशबू देता है, लंबी जुदाई, मच गया शोर सारी नगरी में, जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं, SR Star Musical Groups आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे, कान में झुमका चाल में ठुमका, मेरे नैना सावन भादो, कितनी हसीन कितनी जवान रात, जो बात तुझमें है, साथिया तूने क्या किया, आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, जीत जायेंगे हम तू अगर संग है, बाहों में तेरे मस्ती के डेरे, ओ मनचली कहाँ चली, कौन है जो सपनों में आया, ओ साहेबा आदी लोकप्रिय गाण्यांची मैफल रंगली. साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात तब्बल ५० एकल व युगुल हिट गीते सादर करण्यात आली.
 
या कार्यक्रमात शांताराम बहादुरे, सोनाली रामेलवार, रिता बहादुरे, प्रतिमा फुलझले, निशा गोडघाटे, अर्चना चंदनखेडे, शांत बहादुरे, अनिल वाकोडे, जितेंद्र इंगुलकर, शांताराम चिखले, दिनकर रामटेके, विनोद पाटील, प्रशांत गेडाम, मिलिंद जाधव आणि देविदास ढेपे आदी गायकांनी आपल्या गायन कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. SR Star Musical Groups कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली रामेलवार यांनी केले, तर संचालन जितेंद्र इंगुलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच उपस्थित रसिकांचे आभार रिता बहादुरे यांनी मानले. ही माहिती एसआर स्टार ग्रुपचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. सोहन चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सौजन्य: सोहन चावरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0