तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
student initiative, दाते महाविद्यालय हे अनोख्या उपक्रमांमुळे कायम चर्चेत राहत असते. आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात पक्षांची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून महाविद्यालयीन परिसरात पाणी व चारा स्टॅण्ड उभारले.
बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशांतून हे चारा स्टॅण्ड व पाणी स्टॅण्ड उभारले आहे. महाविद्यालयीन परिसरात असलेल्या सर्व झाडांवर हे चारा व पाणी स्टॅण्ड लटकविले असून विद्यार्थी समूह या स्टॅण्डमध्ये पाणी व चाèयाची व्यवस्था करणार आहेत. उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी पक्षांची वणवण थांबावी, या हेतूने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला असून यामध्ये महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. परिसरात एकूण 20 स्टॅण्ड बसविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अमोल राऊत यांच्या नियोजन व मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
मराठी विभागातील प्रा. नितेश गेडाम, प्रा. अनिरुद्ध नरखेडकर, प्रा. शुभम चांभारे, प्रा. आशिष कांबळे, प्रा. काजल वांढरे, प्रा. स्नेहल सोनटक्के यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष विनायक दाते आणि सुषमा दाते यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.