मालेगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

16 Mar 2026 18:09:29
मालेगाव,
suicide मालेगाव शहरातील नवीन मालेगाव भागात एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

suicide 
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विजय देवकते (वय २८ ) रा. वार्ड क्र. ८, नवीन मालेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबासोबत राहत होता. रविवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास त्याने घरातील पत्राखाली लावलेल्या बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दरम्यान, गजाननचा भाऊ रविंद्र विजय देवकते हा दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवण करून तो आईसोबत घराबाहेर बसला असताना घरातून खुर्ची पडल्याचा आवाज आला. त्यानंतर दोघेही घरात गेले असता गजानन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर शेजार्‍यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे नेण्यात आले. मात्र डॉटरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मृत गजानन याला फिट येण्याचा त्रास होता व त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. या प्रकरणी मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0