शेतमजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; ९ गंभीर, २१ जखमी

16 Mar 2026 22:05:58
वरूड,
accident-news : वरूड तालुक्यातील इसंब्री येथील संत्रा तोड करणार्‍या शेतमजुरांना मोवाड येथे घेऊन जाणार्‍या पिकअपवरील चालक विजय निस्वादे (२६) यांचे गणेशपूर ते मोवाड डांबरी रस्त्यावरील वर्धा नदीलगत असलेल्या परिसरात वाहनारील अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन अचानक उलटले. या अपघातात ३० जण जखमी झाले असून त्यापैकी ९ गंभीर, तर २१ जण जखमी झाले. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून यातील ९ गंभीर जखमीना नागपूर हलविण्यात आले असून ८ जखमींना वरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरित किरकोळ जखमीवर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
 
j
 
प्राप्त माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात येणार्‍या नरखेड पोलिस स्टेशन हद्दीतील मोवाड येथील एका शेतात संत्रा तोड असल्याने वरूड तालुक्यातील इसंब्री (बहादा) येथील शेतमंजुरांचे पिकअप वाहन वरूडवरून मोवाडकडे जात होते. गणेशपूर ते मोवाड रस्त्यावरील वर्धा नदीलगत असणार्‍या डांबरी रस्त्यावरून मोवाडकडून वरूड मार्गे येणार्‍या भरधाव वाहनाने मोवाडकडे जाणार्‍या पिकअप वाहनाला कट मारला. यामध्ये मजुरांना घेऊन जाणार्‍या पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व पिकअप उलटला. त्यामुळे या वाहनातील चालकासह ३० ही जण जखमी झाले. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी करत अपघाताची माहिती नरखेड व वरूड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून उपस्थित नागरिकांच्या मदतीने वाहनातील ३० ही जखमीना बाहेर काढले. सर्वप्रथम जखमींना मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून ८ जखमींना वरूड ग्रामीण रुग्णालयात तर ९ गंभीर जखमीना नागपूर हलविण्यात आले.
 
 
वरूड तालुक्यातील इसंब्री (बहादा) येथील शेतीकामासाठी जाणार्‍या ३० मजुरांचे वाहन उलटले. यामध्ये ३० जण जखमी झाले. गंभीर जखमीना नागपूर मेडिकल कॉलेज व काही जखमींना वरूड येथे पुढील उपचारासाठी दाखल केले गेले. मोवाडवासीयांनी दाखवलेल्या तत्परतेने सर्व जखमींना योग्यवेळी उपचार मिळत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही.
-दर्शना हरीश ढोरे
नगराध्यक्षा, नगर परिषद मोवाड
Powered By Sangraha 9.0