12 घरगुती गॅस जप्त; महसूल विभागाची कारवाई

17 Mar 2026 21:07:14
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
domestic-gas-seized : सद्यस्थितीत जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी शासन निर्णयान्वये घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरिता गॅस व्यवसायींच्या तपासण्या करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
 
 
y17March-Japtee
 
 
 
त्यानुषंगाने घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरिता दारव्हा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात 6 गोपनीय पथके नेमून दारव्हा शहरी विभाग व काही ग्रामीण भागांमध्ये नायब तहसीलदार आंबेकर, मंडळ अधिकारी बाळकृष्ण गाढवे, जोशी, मेश्राम यांच्यासह ग्राममहसूल अधिकारी, शिपाई, कोतवाल व पुरवठा विभागातील कर्मचारी असे पथक नेमून कारवाई केली.
 
 
एकाच वेळी शहरी व काही ग्रामीण भागामध्ये धाडी टाकून, तपासण्या करून एकूण 12 घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने जप्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
अनावश्यक साठा करू नये गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून अतिरिक्त सिलिंडर बुक केल्यास वितरण व्यवस्थेवर ताण येतो. तसेच वितरकांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या एजन्सीला सूचना देण्यात येत आहेत.
- तुषार राठोड
पुरवठा निरीक्षक
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडर वापरू नये. घरगुती सिलेंडरचा दारव्हा तालुक्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- राजेश पऊळ
तहसीलदार
Powered By Sangraha 9.0