थकीत करदात्यांवर यवतमाळ नप करणार कठोर कारवाई

17 Mar 2026 20:20:26
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-municipal-council : यवतमाळ नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम सुरू असून त्यासाठी झोननिहाय वसुली पथक सक्रिय आहेत. अभय योजनेनुसार थकित मालमत्ता करावर आकारलेल्या शास्ती करात देण्यात आलेल्या विशेष सवलतींचा अनेक करदात्यांनी लाभ घेतला आहे. तथापि अद्यापही ज्यांनी थकित व चालू कर भरलेला नाही अशा करदात्यांविरुद्ध वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे.
 

k 
 
जुन्या यवतमाळ शहरासह नप हद्दीतील लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, भोसा, डोरली, डोळंबा, उमरसरा आणि वडगाव परिक्षेत्रीय कार्यालयामार्फत करवसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पथकात नियुक्त वरिष्ठ अधिकारी व वसुली कर्मचाèयांनी थकित करदात्यांना गृहभेटी दिल्यानंतरही जे थकितदार कर भरणार नाहीत अशा करदात्यांविरुद्ध जप्तीसह दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी वसुली पथकांना दिले आहेत.
 
 
तदनुसार कर वसुली विभाग वर्तमानपत्रातून थकितदारांची यादी जाहीर करणार असून त्यापूर्वीच वसुली पथकाने गृहभेट दिलेल्या करदात्यांनी थकित व चालू कराचा भरणा करावा अन्यथा त्यांच्या विरोधात महाराट्र नप व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार जप्तीची कार्यवाही करण्यात येईल.
 
 
ही संभाव्य व अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी थकितदारांनी आपल्याकडील मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन यवतमाळ नगर परिषद प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
Powered By Sangraha 9.0