तपोवनमध्ये काळ्या जादूचा धक्कादायक प्रकार; परिसरात भीतीचे वातावरण

17 Mar 2026 15:15:07
नाशिक,
black-magic-in-tapovan : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधीच तपोवन परिसरात एका झाडावर एका कुटुंबाच्या फोटोला बिब्बे आणि काळ्या बाहुल्या लावून खिळे ठोकले गेले, असा भयानक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात भय आणि तणाव पसरला आहे.
 
tapovan
 
 
पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करत या प्रकारामुळे झाडांना इजा पोहोचल्याचे सांगितले. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारचे प्रयोग थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठळक केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नागरिकांसाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करून या घटनेबाबत जनजागृती करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0