कारंजा लाड,
Chief Officer Waghmode जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कारंजा नगर परिषदेत मुख्याधिकारी पदाचा पदभार पुन्हा महेश शिवाजी वाघमोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या आदेशामुळे काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रशासकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांच्या पूर्वीच्या आदेशानुसार वाघमोडे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वाघमोडे यांनी १६ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास आपला सविस्तर खुलासा सादर केला. या खुलाशामध्ये त्यांनी कारंजा नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर पुन्हा रुजू करून घेण्याची विनंती केली होती. सदर खुलासा विचारात घेऊन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हा आदेश जारी केला. Chief Officer Waghmode या आदेशानुसार कारंजा नगर परिषद येथील मुख्याधिकारी पदाचा कार्यभार पूर्ववत महेश शिवाजी वाघमोडे यांच्याकडे देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशात वाघमोडे यांनी तात्काळ मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारून त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई तसेच अमरावती विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, कारंजा नगर परिषदेत गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी पदाबाबतची प्रशासकीय परिस्थिती चर्चेत होती. आता जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट आदेश काढल्यामुळे नगर परिषद प्रशासनात स्थैर्य येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. Chief Officer Waghmode तसेच शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रशासनिक कामकाजाला गती मिळेल, अशीही आशा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.