महिन्याभरातच चेंबरला तडा

17 Mar 2026 17:00:38
नागपूर,
Diamond Nagar, Nagpur पूर्व नागपूर मधील डायमंड नगर येथे नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामानंतर अवघ्या एका महिन्यातच चेंबरचे झाकण तुटल्याची घटना समोर आली आहे.सदर ठिकाणी रस्त्याच्या उंचीनुसार नवीन चेंबर व झाकणे बसविण्यात आली होती. मात्र, डायमंड नगरातील कॉर्नरवरील एका चेंबरच्या झाकणाला तडा गेल्याचे निदर्शनास आले आहे.
 
 
du
 
 
या परिसरातच ट्युशन क्लास असल्यामुळे लहान मुलांची सतत ये-जा असते. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. Diamond Nagar, Nagpurनागरिकांनी प्रशासनाकडे या तुटलेल्या झाकणाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य:अंशुल जिचकार ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0