पहलगाम,
fire-in-pahalgam-hotel दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका हॉटेलला मंगळवारी भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीची धडक बसल्याने दुसऱ्या हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
पहलगामच्या लारीपोरा परिसरात लागलेल्या या आगीत 'असाल रिसॉर्ट' हॉटेलच्या तीन इमारती आणि एक वाहन जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी पहलगाम, सल्लार, अनंतनाग आणि अश्मुकाम येथील अग्निशमन दले घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी अनेक एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग विझवणे कठीण झाले होते. fire-in-pahalgam-hotel त्यांनी सांगितले की, नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली, परंतु या घटनेत हॉटेलच्या तीन इमारती आणि एका वाहनाचे नुकसान झाले. आगीचे कारण सध्या अज्ञात आहे.
या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त असून, रिसॉर्ट व्यवस्थापकाने अंदाजे ५०-६० कोटी रुपयांच्या नुकसानीचा दावा केला आहे. "ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आगीत आमच्या तीन इमारती जळून खाक झाल्या. fire-in-pahalgam-hotel अंदाजे ५०-६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे," असे असल रिसॉर्टचे व्यवस्थापक ओमर हुसेन यांनी सांगितले. आगीच्या कारणाचा सध्या तपास सुरू आहे.