पिरॅमिड गॅस एजन्सीवर अन्न व पुरवठा विभागाचा छापा ; तब्बल ५७ गॅस सिलेंडर जप्त

17 Mar 2026 20:02:49
भंडारा,
Gas Cylinders Seized युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन जिल्ह्यात गॅस सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अन्न पुरवठा विभागाने मंगळवारी भंडाऱ्यातील एका गॅस एजन्सीवर टाकलेल्या छाप्यात एका गोदामात अवैधपणे गॅस सिलिंडरचा साठा केल्याचे समोर आले. या छाप्यात तब्बल ५७ जप्त करण्यात आले. भंडारा शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी चोरट्या मार्गाने घरगुती गॅसचा वापर सुरू केल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. घरगुती ग्राहकांकडूनदेखील गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
  
bhandara
 
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून अन्न आणि पुरवठा विभागाच्या अवैध सिलेंडर साठेबाजीवर सातत्याने कारवाई सुरू आहेत. दरम्यान १६ मार्च २०२६ रोजी भंडारा एम.आय.डी.सी. परिसरात जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. Gas Cylinders Seized  अधिकृत परवाना आणि फलक नसलेल्या या गोदामात घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलेंडर्सचा मोठा साठा सापडला. जप्त केलेल्या ५७ सिलिंडर पैकी १४.२ किलो (घरगुती): ४० रिकामे सिलिंडर,
१९ किलो (व्यावसायिक): ८ रिकामे सिलिंडर
५ किलो (लहान): ५ रिकामे सिलिंडर
१० किलो (घरगुती): २ भरलेले आणि १ रिकामा सिलिंडर (एकूण ३)
५ किलो (घरगुती): १ असे भरलेला सिलिंडर ५४ रिकामे आणि ३ भरलेले सिलिंडर असे एकूण ५७ सिलिंडर जप्त करण्यात आले.
 
तपासणी दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी आग प्रतिबंधक यंत्रे किंवा गॅस सिलेंडर मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांसारखी कोणतीही साधने तिथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले, जे नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. गोदामावर उपस्थित असलेले मनीष भूपेंद्र खारा (वय ५२, रा. भंडारा) यांना कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी कोणतेही अधिकृत परवाने सादर केले नाहीत. Gas Cylinders Seized  तसेच, गोदामातील साठ्याबाबत त्यांनी प्रशासनाला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या वाहनचालकाने (प्रभाकर मेश्राम) त्यांच्या वाहनाची बॅटरी डाऊन झाल्याने रिकामे सिलेंडर तिथे ठेवल्याचे सांगितले. तरी मोठ्या प्रमाणातील साठा पाहता या गोदामातुन अनाधिकृतरित्या गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, निरीक्षण अधिकारी लाखनी रोशन कापसे, निरीक्षण अधिकारी, भंडारा पोचीराम कापडे, निरीक्षण अधिकारी, साकोली रविंद्र उन्हाळे, निरीक्षण अधिकारी लाखांदुर धीरज मेश्राम, या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. Gas Cylinders Seized  जप्त केलेला मुद्देमाल त्याच गोदामात ठेवून गोदामाला 'सील' करण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या परवानगीशिवाय हे सील उघडू नये, अशा कडक सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, पिरॅमिड गॅस एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव संबधित ऑईल कंपनीच्या अधिका-यांना सादर करण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0