नागपूर,
Hindustan Book of Records चिन्मयी जोशी हिने ‘हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तर्फे आयोजित ॲबॅकस परीक्षेत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला आहे. माऊंट लिटेरा झी स्कूलची इयत्ता दुसरीतील ही विद्यार्थिनी आपल्या उज्ज्वल यशामुळे सर्वांच्या कौतुकाची धनी ठरली आहे.दिनांक १ मार्च २०२६ रोजी एनरिको हाइट्स, नागपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चिन्मयीला चषक, सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे तिच्या यशात आणखी भर पडली असून कुटुंबीय व शाळेचा अभिमान उंचावला आहे.
अभ्यासाबरोबरच ॲबॅकससारख्या कौशल्याधारित क्षेत्रात प्रावीण्य मिळवत चिन्मयीने चिकाटी, एकाग्रता आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. Hindustan Book of Recordsतिच्या या यशामागे तिचे मार्गदर्शक सुनिता चापके, आई रेणुका अमोघ जोशी तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
सौजन्य:अमोल पुसदकर,संपर्क मित्र