पर्यावरण संवर्धन संस्थेला हिंगणघाट भूषण सन्मान पुरस्कार प्रदान

17 Mar 2026 19:42:25
हिंगणघाट,
Hinganghat Bhushan Honor Award स्थानिक श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हिंगणघाट भूषण सन्मान सोहळा, रतदान व नेत्रदान संकल्प शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी पर्यावरण संवर्धन संस्थेला हिंगणघाट भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, सुप्रसिद्ध मूर्तिकार व कलाकार हरीहर पेंदे, माजी आ. डॉ. वसंत बोंडे उपस्थित होते.
 
 
Hinganghat
 
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात गेल्या ५२ वर्षांपासून सेवा कार्य करत असलेल्या डॉ. आमटे दाम्पत्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगताना आदिवासी समाजातील मूल्यव्यवस्था आणि स्त्री सन्मानाची परंपरा अधोरेखित केली. तसेच बाबा आमटे यांना दिलेले आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे वचन पूर्ण करत असल्याचे समाधान त्यांनी व्यत केले. Hinganghat Bhushan Honor Award त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने सभागृह काही काळ शांत व स्तब्ध झाले होते. यावर्षीचा हिंगणघाट भूषण सन्मान पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाट यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
 
यावेळी कलाकार हरीहरी पेंदे यांनी साकारलेले आमटे दाम्पत्याच्या जीवनकार्यावर आधारित तैलचित्रही प्रदर्शित करण्यात आले. नेत्रदान संकल्पाला प्रतिसाद देणार्‍या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. Hinganghat Bhushan Honor Award देशसेवेसाठी सीडीएस-यूपीएससीमार्फत लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल वेदांत प्रभाकर कोळसे तसेच प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सलोनी कापकर हिचाही सत्कार करण्यात आला.
 
 
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, डॉ. प्रकाश लाहोटी, दिगांबर खांडरे, राजेंद्र झोटींग, डॉ. निर्मेश कोठारी, सतीश वखरे, रुग्णमित्र गजू कुबडे, नगरसेवक धनंजय बकाने यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Hinganghat Bhushan Honor Award डॉ. आमटे दाम्पत्याला देण्यात आलेल्या सतीश वखरे यांनी शब्दांकित केलेल्या ‘प्रकाशवाटा’ मानपत्राचे वाचन प्रा. अभिजित डाखोरे यांनी तर हिंगणघाट भूषण सन्मानपत्राचे वाचन सनी बासनवार यांनी केले. संचालन दीपक माडे यांनी केले, प्रास्ताविक धनराज कुंभारे यांनी तर आभार गुणवंत ठाकरे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0