नागपूर,
Malhar Rao Holkar सुभेदार मल्हारराव होळकरयांच्या ३३३ व्या जयंतीनिमित्त धनगर युवक मंडळ, नागपूर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम स्वाती अपार्टमेंट येथील मंडळाच्या कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव गणेश पावडे तसेच दीपकराव अवताडे, देविदासजी आगरकर, अशोक सांभारे, नामदेवराव खाटके, Malhar Rao Holkar धनराज खरबडे, त्रिलोकचन खरबडे, सौ. वैशाली उज्ज्वल रोकडे, शशिकांत बुलकर, साहेबराव सरोदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र