जामीनावरील खूनाच्या आरोपीची तलवारीने हत्या

17 Mar 2026 18:18:35
आरोपीचे पोलिस पाटलाकडे आत्मसमर्पण
गोंदिया,
Murder खूनाच्या आरोपावरून भंडारा येथील जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असताना जामिनावर सुटून घरी परत आलेल्या आरोपीची वडीलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या भावनेतून दोन भावंडांनी तलवारीने हत्या केल्याची घटना सोमवारी 16 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील हेटी/पालेवाडा येथे घडली. देवेंद्र उर्फ भुरू चुनीलाल ताराम (24) रा. हेटी/पालेवाडा असे मृताचे नाव आहे. सुनील आसाराम कांबळे (25), हंसराज आसाराम कांबळे (45) दोघेही रा. हेटी/पालेवाडा अशी आरोपींची नावे आहे. घटनेनंतर हत्येतील एकाने गावातील पोलिस पाटील यांच्याकडे तलवारीसह आत्मसमर्पण केले.
 
 
Murder
 
दरम्यान, पोलिस पाटीलाच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून हत्येतील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत देवेंद्र हा दोन्ही आरोपींच्या वडिलांच्या खूनाच्या आरोपाखाली भंडारा येथील जिल्हा कारागृहात कैदेत होता. त्यातच काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आपल्या गावी परतला होता. याच दरम्यान, आरोपी सुनील व हंसराज यांनी देवेंद्र याला गावात पाहताच त्याचेवर हल्ला चढवून तलवारीने त्याच्या गळा, दोन्ही हात, पोट व मानेवर वार करून खून केला. घटनेनंतर लगेच सुनील याने गावातील पोलिस पाटलांकडे जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिस पाटलांनी तात्काळ याबाबत गोरेगाव पोलिसांना माहिती दिली. Murder घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. प्राथमिक तपासात हा खून जुन्या वैरातून झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. पुढील तपास गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून घटनेच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या वैराच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
  
 
मागील वर्षी जून महिन्यात आरोपी सुनील व हंसराज यांच्या वडिलांचा हेटी जंगल शिवारात खून झाला होता. या प्रकरणात मृतक देवेंद्र तारामविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याची भंडारा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती, सात महिन्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.  Murder दरम्यान, घटनेच्या वेळी तो बाहेर गावाहून घरी परत जात असताना गावात येताच त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यातच देवेंद्र गतप्राण झाला.
Powered By Sangraha 9.0