देखभाल व दुरुस्तीसाठी उद्या काही भागांत वीजपुरवठा बंद

17 Mar 2026 21:11:12
नागपूर, 
power-supply-shut-down : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने महावितरणतर्फे बुधवारी, १८ मार्च रोजी महाल परिसरात तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती येणार आहेत. या कामामुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे.
 

shut down 
 
 
 
या कामांमुळे महाल विभागातील ११ केव्ही दक्षिणामूर्ती वाहिनीवरील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत कुंभारपुरा, चितार ओळ, गरुड खांब, बडकस चौक आणि गजानन मंदिर परिसर या भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे बंद असेल. तर, ११ केव्ही महाल १ वाहिनीवर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाल चौक, पुस्तक बाजार चौक, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, संघ बिल्डिंग परिसर आणि केळीबाग रोड या भागांतील वीजपुरवठा राहणार आहे.
 
 
याशिवाय, बुटीबोरी विभागात एमआयडीसी उपकेंद्रातील वाहिनी क्रमांक १२ वरील ए झोन, वाहीनी क्रमांक ७ आणि वाहीनी क्रमांक ३ वरील बी झोन औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपासून बंद राहील.
Powered By Sangraha 9.0