नागपूर,
sanjana-mandar-mangle : सावनेर नगर परिषदेत नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे यांनी ठामपणे सांगितले की शहरातील विक्रेत्यांवरील अवैध बाजार शुल्क वसुली कायम राहणार नाही. शहरातील दैनंदिन व आठवडी बाजारांसाठी बाजार शुल्क पारदर्शकपणे वसूल केले जाईल, तसेच कंत्राटदाराने ठराविक दरापेक्षा जास्त वसुली केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
नगर परिषदेत झालेल्या निर्णयानुसार बाजार शुल्काचे दर ठरले आहेत: ५×१० चौ. फूट - ₹१०, १०×१५ चौ. फूट - ₹२०, १०×२० चौ. फूट - ₹३०, आणि आठवडी बाजारातील हॉटेल/इतर व्यवसाय - ₹५०. या दरानुसारच भविष्यात कंत्राटदाराने शुल्क वसूल करणे बंधनकारक राहील.
नगराध्यक्षा मंगळे यांनी सांगितले की, शहरातील गोरगरीब भाजीपाला विक्रेते आणि लहान व्यावसायिक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही नगर परिषदची जबाबदारी आहे आणि कोणत्याही प्रकारची अवैध वसुली सहन केली जाणार नाही.
कर निरीक्षक यांच्याकडे देखरेख ठेवण्यात येईल, तसेच कंत्राटदाराने नियम तोडल्यास अनामत रक्कम जप्त करून काळ्या यादीत टाकली जाईल. नगरसेवक आणि पदाधिकारी शहरातील विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सक्रिय आहेत.