नागपूर,
Social Womens अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपूर आणि स्वामीनी महिला सेवा समिती मर्यादित, बेसा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला बेसा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष किर्ती बडोले, निलीमा बावने (संस्थापक अध्यक्ष, धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर), ॲड. विजयता कांबळे (सदस्य, महिला तक्रार निवारण न्यास, नवी दिल्ली) आणि छाया शुक्ला ह्या हजर होत्या.
कार्यक्रमात प्रामुख्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूरचे महिला संघटक संध्या पूनीयानी, जिल्हा अध्यक्ष संजय साळवे, सचिव प्रभाकर शिवनकर, उपाध्यक्ष राजेंद्र दिवारे, सहसचिव विनोद चरपे, प्रकाश क्षीरसागर तसेच कल्याणी जयपूरकर, अर्चना मेहरे, Social Womens कविता भोसले, कल्पना बनकर, विजया मौदेकर, छाया दास, चंदा तीवारी, सोनीया परमार व संध्या तीवारी ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमात एकूण १२५ महिलांची उपस्थिती नोंदवली गेली. सूत्रसंचालन कविता भोसले यांनी केले.
सौजन्य: राजेंद्र दिवारे, संपर्क मित्र