२२ पैकी २१ जागांवर विजय
गोंदिया,
Vidarbha Sahitya Sangh विदर्भ साहित्य संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत गिरीश गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘सृजन सेतु पॅनेल’ने ऐतिहासिक कामगिरी करत कार्यकारिणीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अध्यक्षपदासाठी गिरीश गांधी यांनी २६६१ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला, तर त्यांच्या पॅनेलने २२ पैकी तब्बल २१ जागांवर विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धक्का दिला.
या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याचे प्रख्यात साहित्यकार ॲड. लखनसिंह कटरे यांनीही प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कटरे यांना एकूण २३८४ मते मिळाली. विशेष म्हणजे, अत्यंत मर्यादित प्रचारकाळ असूनही त्यांनी विदर्भभरातील मतदारांचा व्यापक पाठिंबा मिळवला. Vidarbha Sahitya Sangh पवार साहित्य कला संस्कृती मंडल, भारतचे अध्यक्ष असलेले कटरे हे पोवार समाजाच्या इतिहासात ‘साहित्य अकादमी’ सदस्यपदापर्यंत पोहोचणारे एकमेव साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या विजयाला त्यांच्या साहित्यिक कार्याची पोचपावती मानले जात आहे.
मतदारांनी दिलेला हा कौल साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सकारात्मक दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. Vidarbha Sahitya Sangh गिरीश गांधी आणि ॲड. कटरे यांच्या नेतृत्वामुळे विदर्भ साहित्य संघ नव्या जोमाने कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, या ऐतिहासिक विजयाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील विविध संस्था व मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.