चण्याच्या ढिगाला आग लावणार्‍या दोघांना अटक

17 Mar 2026 19:52:57
सेलू,
Wardha News सेलू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेतात ढिग लावून ठेवलेल्या चण्याला आग लावली होती. यात शेतकर्‍याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान, शेतकर्‍याने पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली. तालुयातील वघाळा येथील शेतकरी गजानन कांबळे यांचे मुकिंदापूर शिवारातील शेतात चणा काढून ढिग करून ठेवला होता. दरम्यान, २८ फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास चण्याच्या ढिगाला आग लावण्यात आली होती.
 
 
Wardha News
 
याबाबतची तक्रार प्राप्त होताच पोलिस अंमलदार विक्रम काळमेघ व रामकिसन इप्पर गुन्हाचा तपास करीत असताना १६ रोजी राहुल श्रीखंडे (३४) आणि मंगेश भुजाडे (३४) दोन्ही रा. कोपरा ता. सेलू यांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत दोघांनीही आग लावल्याचे कबुल केले. Wardha News पोलिसांनी दोघांनाही अटक करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रितम निमगडे, पोलिस अंमलदार विक्रम काळमेघ, रामकिसन इप्पर यांनी केली.
Powered By Sangraha 9.0